बेंगळूर/प्रतिनिधी
कर्नाटकात कोरोना रुग्णांच्या संख्येत दररोज घट होत आहे. बुधवारी राज्यात पॉझिटिव्ह रुग्णांपेक्षा बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या जास्त होती. दरम्यान बुधवारी राज्यात ४,४३६ जणांना कोरोनाची लागण झाली. याच वेळी ६,४५५ रुग्ण कोरोनावर मात करत रुग्णालयातून घरी परतले. तर कोरोनामुळे १२३ रुग्णांचा मृत्यू झाला. राज्यात सध्या कोरोना सक्रिय रुग्णांची एकूण संख्या १,१६,४५० इतकी आहे. बुधवारी राज्यात सकारात्मकतेचे प्रमाण २.५९ टक्के होते.
आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार बेंगळूर शहरी जिल्ह्यात १,००८ नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली. तर १,०७१ रुग्ण कोरोनामुक्त झाले. तसेच कोरोनामुळे २४ संक्रमित रुग्णांचा मृत्यू झाला आहे.