बेंगळूर/प्रतिनिधी
कर्नाटकात कोरोना सक्रिय रुग्णांची संख्या कमी कमी होत आहे. राज्यात सध्या सक्रिय रुग्णांची संख्या २ लाखापेक्षा कमी आहे. राज्यात शनिवारी ९,७८५ नवीन संक्रमित रुग्णांची नोंद झाली. तर २१,६१४ रुग्ण कोरोनावर मात करत रुग्णालयातून घरी परतले. राज्यात शनिवारी १४४ रुग्णांचा मृत्यू झाला. दरम्यान राज्यात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांपेक्षा बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या वाढत आहे.
राज्यात बेंगळूर शहरी जिल्ह्यात शनिवारी कोरोनाचे २,४५४ रुग्ण आढळले. तर याचवेळी ५,३९८ रुग्ण कोरोनावर मात करत रुग्णालयातून घरी परतले. तसेच जिल्ह्यात २१ रुग्णांचा मृत्यू झाला.
दरम्यान, राज्यात आतापर्यंत एकूण कोरोना रुग्णांची संख्या २७,५७,३२४ वर पोहोचली आहे. तर यापैकी २५,३२,७१९ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. साचे आतापर्यंत ३२,७८९ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्यात सध्या एकूण सक्रिय रुग्णांची संख्या १,९१,७९६ इतकी आहे.