- मागील 24 तासात 18,600 नवे रुग्ण; 22,532 जणांना डिस्चार्ज
ऑनलाईन टीम / मुंबई :
महाराष्ट्रात मागील काही दिवसांत कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत चढ-उतार पाहायला मिळत आहे. शनिवारी राज्यात 20 हजारहून अधिक कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली होती. परंतु, रविवारी हा आकडा कमी झाला आहे. मागील 24 तासात राज्यात 18 हजार 600 नव्या रुग्णांचे निदान झाले आहे. तर एकूण 22 हजार 532 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. त्यामुळे राज्यातील एकूण कोरोना बाधितांची संख्या 57 लाख 31 हजार 815 वर पोहचली आहे.
दरम्यान, कालच्या दिवशी 402 जणांनी आपला जीव गमावला आहे. त्यामुळे सद्य स्थितीत राज्यात मृत्यूचे प्रमाण 1.65 % इतके आहे. महाराष्ट्र आतापर्यंत 53 लाख 62 हजार 370 रुग्ण कोरोनामुक्त झाले असून बरे होण्याचे प्रमाण 93 % इतके आहे. सद्य स्थितीत राज्यात 2,71,801 रुग्णांवर विविध रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
आतापर्यंत तपासण्यात आलेल्या 3 कोटी 48 लाख 61 हजार 608 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 16.44 % रुग्ण पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 19 लाख 98 हजार 976 व्यक्ती होमक्वारंटाइनमध्ये आहेत. तर, 12 हजार 981 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये आहेत.