प्रतिनिधी/कोल्हापूर
जिल्ह्यात शनिवारी सलग चौथ्या दिवशी कोरोना मृत्यूसंख्या शुन्य राहिली. कोरोनाचा प्रादूर्भाव कमी झाल्याचे दिलासादायक चित्र आहे. 24 नवे रुग्ण आढळून आले, तर दिवसभरात 22 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. सक्रीय रुग्णसंख्या 266 इतकी आहे.
आरोग्य विभागाकडून प्राप्त झालेल्या अहवालानुसार शनिवारी चंदगड, गडहिंग्लज, गगनबावडा, कागल, शाहूवाडी, शिरोळ तालुक्यात एकही रुग्ण मिळाला नाही. तर आजरा, भुदरगड, हातकणंगले, करवीर, पन्हाळा, राधानगरी तालुक्यात प्रत्येकी 1 रुग्ण मिळाला. शहर परिसरात 13 रुग्ण आढळून आले. आरटीपीसीआर चाचणीच्या 311 अहवालांमधून 3, अँटीजेन टेस्टच्या 372 अहवालांमधून 2 तर खासगी रुग्णालय आणि लॅबमधून प्राप्त झालेल्या 859 अहवालामधून 19 जणांचा अहवाल पॉझिटीव्ह प्राप्त झाला.