ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
दिल्लीतून एक दिलासादायक बाब समोर आली आहे. दिल्लीत आज दिवसभरात 1200 रुग्णांची प्रकृती सुधारली असून त्यांना घरी सोडण्यात आले आहेे. त्यामुळे आत्तापर्यंत 1 लाख 46 हजार 588 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.
तर दिवसभरात 1061 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली. तर 13 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे दिल्लीतील कोरोना बाधितांची एकूण संख्या 1 लाख 62 हजार 527 वर पोहचली आहे. यामधील 11 हजार 626 रुग्णांवर विविध रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
दिल्लीत आतापर्यंत 4313 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे दिल्लीवासियांची चिंता वाढली असून भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.