ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
राजधानी दिल्लीत सोमवारी केवळ 648 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली. ही मागील अडीच महिन्यातील सर्वात कमी संख्या आहे. तर कालच्या 86 जणांनी आपला जीव गमावला आहे. आरोग्य विभागाकडून दिलेल्या माहितीनुसार, राजधानी दिल्लीत कोरोना संसर्गाचा दर एक टक्क्यांपेक्षा कमी आला आहे. जो 19 मार्चनंतरचा सर्वात कमी दर आहे.
शहरात दुसऱ्यांदा 100 पेक्षा कमी रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर सद्य स्थितीत 11,040 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. रविवारी दिल्लीत 947 नवे रुग्ण आढळून आले होते तर 78 रुग्णांचा मृत्यू झाला होता. तर संक्रमणाचा दर 1.25 % इतका होता. तर आज हाच दर 0.99% आहे.
त्यामुळे दिल्लीतील कोरोना बाधितांची एकूण संख्या 14 लाख 23 हजार 690 वर पोहचली आहे. यामधील 23 हजार 951 वर रुग्णांवर विविध रुग्णालयात उपचार सुरू आहेत. काल दिवसभरात 1622 रुग्णांची प्रकृती सुधारली असून त्यांना घरी सोडण्यात आले आहेे. तर आतापर्यंत 13 लाख 90 हजार 963 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तर आतापर्यंत 24,237 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
ताज्या आकडेवारी नुसार, दिल्लीत मागील 24 तासात 9758 लोकांना लस देण्यात आली. यामध्ये 9339 जणांना पहिला डोस 419 जणांना दुसरा डोस देण्यात आला. तर राजधानी दिल्लीत आतापर्यंत एकूण 53 लाख 53 हजार 524 जणांचे लसीकरण पूर्ण झाले आहे.