ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
दिल्लीतून एक दिलासादायक बाब समोर आली आहे. दिल्लीत गेल्या 24 तासात 1310 रुग्णांची प्रकृती सुधारली असून त्यांना घरी सोडण्यात आले आहेे. त्यामुळे आत्तापर्यंत 1 लाख 37 हजार 561 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.
तर रविवारी 652 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली. तर 8 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे दिल्लीतील कोरोना बाधितांची एकूण संख्या 1 लाख 52 हजार 580 वर पोहचली आहे. यामधील 10 हजार 823 रुग्णांवर विविध रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
दिल्लीत आतापर्यंत 4196 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे दिल्ली वासियांची चिंता वाढली असून भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
ताज्या आकडेवारी नुसार, दिल्लीत आतापर्यंत जवळपास 13 लाख 02 हजार 120 टेस्ट करण्यात आल्या आहेत. त्यातील 3024 आरटीपीसीआर टेस्ट आणि 7685 रैपिड एंटिजेन टेस्ट करण्यात आल्या आहेत.