ऑनलाईन टीम / नागपूर :
नागपूरमध्ये मागील काही दिवस रुग्ण संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. मात्र, आज एक दिलासादायक बाब समोर आली आहे. मागील 24 तासात संसर्ग वाढीपेक्षा रुग्ण बरे होणाऱ्यांचे प्रमाण अधिक आहे.
आज दिवसभरात आज दिवसभरात 7,266 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. तर 7,229 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली असून 98 रुग्णांनी आपला जीव गमावला आहे.
दरम्यान, शहरात कोरोना रुग्णांची एकूण संख्या 3 लाख 43 हजार 589 वर पोहोचली आहे. त्यातील 2,65, 457 रुग्ण कोरोनामुक्त झाले असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे. सद्य स्थितीत नागपूरमध्ये 71,557 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. कोरोनामुळे आतापर्यंत 6,575 जणांनी कोरोनामुळे आपला जीव गमवावा लागला.