ऑनलाईन टीम / चंदीगड :
देशात कोरोनाचा माधव दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. त्यातच पंजाब मधून एक दिलासादायक बातमी समोर येत आहे. पंजाब मध्ये काल शुक्रवारी एका दिवसात 508 रुग्ण कोरोनामुक्त झाले. तर आत्तापर्यंत एकूण 751 रुग्णांची प्रकृती स्थिर असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवारी कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांमध्ये गुरदासपूर मधील 107, तरनतारन मधील 81, जालंधर मधील 79, अमृतसर जिल्ह्यातील 65, संगरुर मधील 51, मोगा मधील 46, मोहालीतील 35, बठिंडा मधील 21, लुधियाना तील 11, फतेहगड साहेब मधील 7 जण, मुक्तसर साहेब मधील 2 जण तर मानसा, फरीदकोट आणि नावांशहर मधील प्रत्येकी एक रुग्णाचा समावेश आहे.
दरम्यान, शुक्रवारी पंजाब मध्ये 2 नव्या रुगांना कोरोनाची लागण झाली. त्यातील दोन जणांचा मृत्यू झाला. त्यामुळे राज्यातील कोरोना ग्रस्तांची एकूण संख्या 1934 वर पोहचली आहे.