- सोमवारी 4009 नवे रुग्ण; 104 मृत्यू
ऑनलाईन टीम / मुंबई :
महाराष्ट्रात मागील 24 तासात 10,225 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. राज्यात आतापर्यंत 15 लाख 24 हजार 304 रुग्ण कोरोनामुक्त झाले असून, त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. राज्यातील कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण सध्या 90.31% आहे.
दरम्यान, मागील 24 तासात राज्यात 4009 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले. त्यामुळे राज्यातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या 16 लाख 87 हजार 784 वर पोहचली आहे. सध्या 1 लाख 18 हजार 777 रुग्ण उपचार घेत आहेत. सोमवारी दिवसभरात 104 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला. तर मृतांचा एकूण आकडा 44 हजार 128 एवढा आहे. सध्या राज्यातील मृत्यू दर 2.61 % आहे.
प्रयोगशाळेत आतापर्यंत तपासणीसाठी पाठविण्यात आलेल्या 90 लाख 65 हजार 168 नमुन्यांपैकी 16 लाख 87 हजार 784 रुग्णांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 25 लाख 33 हजार 780 लोक होम क्वारंटाईनमध्ये असून, 12 हजार 195 लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.