ऑनलाईन टीम / मुंबई :
महाराष्ट्रात कोरोना बाधितांची संख्या गेले काही दिवसांपासून कमी जास्त होताना दिसत आहे. मागील 24 तासात 6 हजार 740 नवीन कोरोनाबाधित आढळले असून 13 हजार 027 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर कालच्या दिवशी 51 रूग्णांचा मृत्यू झाला आहे.
राज्यात आजपर्यंत एकूण 58 लाख 61 हजार 720 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे 96.02 टक्के इतके झाले आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर 2.01 टक्के एवढा आहे.
दरम्यान, आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 4,27,12, 943 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 61 लाख 04 हजार 177 नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 6,42,67 व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर 4,3 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात सद्य स्थितीत 1 लाख 23 हजार 139ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.