- मागील 24 तासात 7,603 नवे रुग्ण, 53 मृत्यू
ऑनलाईन टीम / मुंबई :
महाराष्ट्रात कोरोनाची दुसरी लाट ओसल्यानंतर राज्यातील रुग्णसंख्या मोठ्या प्रमाणात घटली. मागील 24 तासात राज्यात 7 हजार 603 नवीन कोरोनाबाधित आढळले असून 15 हजार 277 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर कालच्या दिवशी 53 रूग्णांचा मृत्यू झाला आहे.
राज्यात आजपर्यंत एकूण 59 लाख 27 हजार 756 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 96.15 टक्के इतके झाले आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर 2.04 टक्के एवढा आहे.
दरम्यान, आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 4,41,86,449 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 61,65,402 (13.95%) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 5,82,476 व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर 4,654 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात सद्य स्थितीत 1 लाख 08 हजार 343 ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.
- मुंबई : सध्या 7,120 रुग्णांवर उपचार सुरू
मुंबईत कोरोना रुग्णांच्या संख्येत घट होताना दिसत आहे. मागील 24 तासात 478 नवीन कोरोना रुग्ण आढळून आले. तर 701 रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. तर कालच्या दिवशी 9 जणांचा मृत्यू झाला. त्यामुळे कोरोना रुग्णांची एकूण संख्या 7,28,174 वर पोहचली असून त्यातील 7,03,077 रुग्णांनी कोरोनावर मात केली असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे. तर आतापर्यंत 15,636 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. रुग्ण दुप्पतीचा काळ 926 दिवस इतका आहे.