ऑनलाईन टीम / मुंबई :
महाराष्ट्रात मागील 24 तासात 10,221 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. राज्यात आतापर्यंत 2 लाख 87 हजार 030 रुग्ण कोरोनामुक्त झाले असून, त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. राज्यातील कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण सध्या 63.76 टक्के आहे.
दरम्यान, मागील 24 तासात राज्यात 8968 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले. त्यामुळे राज्यातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या 4 लाख 50 हजार 196 वर पोहचली आहे. सध्या 1 लाख 47 हजार 018 रुग्ण उपचार घेत आहेत. सोमवारी दिवसभरात 266 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला. तर मृतांचा एकूण आकडा 15 हजार 842 एवढा आहे. सध्या राज्यातील मृत्यू दर 3.52 टक्के आहे.
प्रयोगशाळेत आतापर्यंत तपासणीसाठी पाठविण्यात आलेल्या 22 लाख 98 हजार 723 नमुन्यांपैकी 4 लाख 50 हजार 196 रुग्णांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 9 लाख 40 हजार 486 लोक होम क्वारंटाईनमध्ये असून, 37 हजार 009 लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.