- मागील 24 तासात 4,365 नवे रुग्ण; 105 मृत्यू
ऑनलाईन टीम / मुंबई :
महाराष्ट्रात मागील 24 तासात 4 हजार 365 नवीन कोरोनाबाधित आढळले आले. यासोबतच 6 हजार 384 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर कालच्या दिवशी 105 रूग्णांचा मृत्यू झाला आहे.
राज्यात आजपर्यंत एकूण 62 लाख 21 हजार 305 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 96.97 टक्के इतके झाले आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर 2.11 टक्के एवढा आहे.
दरम्यान, आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 5,19,21,798 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 64,15,335 नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 3,22,221 व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर 2,745 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात सद्य स्थितीत 55 हजार 454 ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.
- पुणे शहरात 182 नवे रुग्ण
काल पुणे शहरात 182 नवे रुग्ण आढळून आले तर 216 जणांना डिस्चार्ज देण्यात आला. कालच्या दिवशी 18 जणांचा मृत्यू झाला. सध्या 208 रुग्ण क्रिटिकल असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. सद्य स्थितीत पुण्यात एकूण पॉजिटिव्ह रूग्णांची संख्या 4 लाख 91 हजार 444 वर पोहोचली असून त्यातील 4,80,424 जण बरे झाले असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे. तर 2,146 सक्रिय रुग्ण आहेत. तर आतापर्यंत 8,874 रुग्णांनी आपला जीव गमावला आहे.