ऑनलाईन टीम / मुंबई :
देशात कोरोनाचा प्रादुर्भाव वेगाने वाढत आहे. त्यातचमहाराष्ट्रातून दिलासादायक बाब समोर आली आहे. सलग दुसऱ्या दिवशीही रुग्ण बरे होण्याची संख्या 10 हजार पेक्षा अधिक आहे. राज्यात मागील 24 तासात 12 हजार 326 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. राज्यात आतापर्यंत 2 लाख 99 हजार 356 रुग्ण कोरोनामुक्त झाले असून, त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. राज्यातील कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण सध्या 65.37 टक्के आहे.
दरम्यान, मागील 24 तासात राज्यात 7760 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले. त्यामुळे राज्यातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या 4 लाख 57 हजार 956 वर पोहचली आहे. सध्या 1 लाख 42 हजार 151 रुग्ण उपचार घेत आहेत. मंगळवारी दिवसभरात 300 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला. तर मृतांचा एकूण आकडा 16 हजार 142 एवढा आहे. सध्या राज्यातील मृत्यू दर 3.52 टक्के आहे.
प्रयोगशाळेत आतापर्यंत तपासणीसाठी पाठविण्यात आलेल्या 23 लाख 52 हजार 047 नमुन्यांपैकी 19.47 टक्के रुग्णांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 9 लाख 44 हजार 442 लोक होम क्वारंटाईनमध्ये असून, 43 हजार 906 लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.