ऑनलाईन टीम / मुंबई :
देशात कोरोना रुग्ण वाढीचे प्रमाण थांबायचे काही नाव घेत नसताना महाराष्ट्रातून एक दिलासादायक बाब समोर आली आहे. राज्यात मागील 24 तासात 22,078 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. राज्यात आतापर्यंत 8 लाख 34 हजार 432 रुग्ण कोरोनामुक्त झाले असून, त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. राज्यातील कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण सध्या 71.47 % आहे.
दरम्यान, मागील 24 तासात राज्यात 21, 656 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले. त्यामुळे राज्यातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या 11 लाख 67 हजार 496 वर पोहचली आहे. सध्या 3 लाख 00 हजार 887 रुग्ण उपचार घेत आहेत. शुक्रवारी दिवसभरात 405 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला. तर मृतांचा एकूण आकडा 31 हजार 791 एवढा आहे. सध्या राज्यातील मृत्यू दर 2.72 % आहे.
प्रयोगशाळेत आतापर्यंत तपासणीसाठी पाठविण्यात आलेल्या 56 लाख 93 हजार 345 नमुन्यांपैकी 11 लाख 67 हजार 496 रुग्णांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 17 लाख 78 हजार 792 लोक होम क्वारंटाईनमध्ये असून, 36 हजार 767 लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.