- कोरोनाबाधितांची संख्या 13 लाख पार
ऑनलाईन टीम / मुंबई :
महाराष्ट्रात मागील 24 तासात 19,592 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. राज्यात आतापर्यंत 9 लाख 92 हजार 806 रुग्ण कोरोनामुक्त झाले असून, त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. राज्यातील कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण सध्या 76.33 % आहे.
दरम्यान, मागील 24 तासात राज्यात 17, 794 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले. त्यामुळे राज्यातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या 13 लाख 00 हजार 757 वर पोहचली आहे. सध्या 2 लाख 72 हजार 214 रुग्ण उपचार घेत आहेत. शुक्रवारी दिवसभरात 775 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला. तर मृतांचा एकूण आकडा 34 हजार 761 एवढा आहे. सध्या राज्यातील मृत्यू दर 2.67 % आहे.
प्रयोगशाळेत आतापर्यंत तपासणीसाठी पाठविण्यात आलेल्या 62 लाख 80 हजार 778 नमुन्यांपैकी 13 लाख 00 हजार 757 रुग्णांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 19 लाख 29 हजार 572 लोक होम क्वारंटाईनमध्ये असून, 32 हजार 747 लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.