ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
देशात मागील 24 तासात 67 हजार 597 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले. तिसऱ्या लाटेतील ही सर्वात कमी रुग्णसंख्या आहे. दैनंदिन रुग्णसंख्येत होणारी घट पाहता तिसरी लाट ओसरत असल्याचे आता स्पष्ट होत आहे. दरम्यान, सोमवारी दिवसभरात 1 लाख 80 हजार 456 रुग्ण कोरोनामुक्त झाले. तर 1188 रुग्णांचा मृत्यू झाला.
सध्या देशात 9 लाख 94 हजार 891 ॲक्टिव्ह कोरोना रुग्ण असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. तर देशातील दैनंदिन पॉझिटिव्हीटी रेट 5.02% आहे. देशात आतापर्यंत कोरोना लसीचे 170.21 कोटी डोस देण्यात आले आहेत.
दरम्यान, महाराष्ट्रातील कोरोना परिस्थिती नियंत्रणात आली आहे. सोमवारी 6436 नवे रुग्ण आढळून आले. तर 24 रुग्ण दगावले. राज्यातील मृत्युदर 1.83 टक्क्यांपर्यंत खाली आला आहे.