ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
देशात रविवारच्या तुलनेत सोमवारी बाधितांच्या संख्येत मोठी घट झाली. मागील 24 तासात 2 लाख 55 हजार 874 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले. रविवारच्या तुलनेत नव्या बाधितांचा हा आकडा 50,190 ने कमी नोंदवला गेल्याने मोठा दिलासा मिळाला आहे. दरम्यान, सोमवारी दिवसभरात 2 लाख 67 हजार 753 रुग्ण कोरोनामुक्त झाले. तर 614 रुग्णांचा मृत्यू झाला.
सध्या देशात 22 लाख 36 हजार 842 ॲक्टिव्ह कोरोना रुग्ण असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. तर देशातील दैनंदिन पॉझिटिव्हीटी रेट 15.52% आहे.
देशात आतापर्यंत कोरोना लसीचे 162.92 कोटी डोस देण्यात आले आहेत. आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, देशात आतापर्यंत 71.88 कोटींहून अधिक कोरोना नमुन्यांची तपासणी करण्यात आली आहे. यातील 16 लाख 49 हजार 108 नमुन्यांची तपासणी गेल्या 24 तासात करण्यात आली.