अचूक बातमी “तरुण भारत”ची, शनिवार 14 ऑगस्ट 2021, सकाळी 10.00
● तपासणी वाढवल्या, दिवसभरात 13,373
● शुक्रवारी आढळून आले 787 बाधित
● मृत्यू दर येतोय नियंत्रणात
● लसीपूर्वी तपासणीमुळे लसीकरणाकडे पाठ
सातारा / प्रतिनिधी :
जिल्ह्यातील बाधितांची संख्या कमी होताना दिसत आहे. गुरुवारच्या तुलनेत शुक्रवारी दिवसभर 200 च्या संख्येने बाधित कमी आढळून आले आहेत. त्यामुळे शनिवारी सकाळी जाहीर झालेल्या अहवालात जिल्ह्यातील 787 जण बाधित असल्याचे आढळून आले आहेत. मृत्यू दर कमी होऊ लागला आहे. तपासणी वाढवली गेली असुन शुक्रवारी दिवसभरात 13, 373 जणांचे swab तपासणी केले आहेत. आढळून आलेल्या बाधित संख्येने जिल्ह्यावासीयांना दिलासा मिळाला आहे. पॉझिटिव्हीटी रेट 5.8 एवढा आला आहे.
आधीच लसीचा तुटवडा, त्यात तपासणीची सक्ती
प्रत्येकाला प्रत्येकाचा जीव प्यारा आहे. जागतिक महामारीच्या प्रकोपातुन बचाव होण्यासाठी लसीकरण महत्वाचे मानले जाऊ लागले आहे. राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी सातारा जिल्ह्यातील लसीकरण वाढविण्याबाबत आदेश दिले गेले होते. मात्र, मंत्री घोषणा करतात अन लगेच गाव पातळीवर त्याची अंमलबजावणी होते असे कधीच होत नाही. त्याचा प्रत्यय जिल्ह्यातील जनतेला येऊ लागला आहे. जिल्ह्यातील प्रत्येकाला लस ही हवी आहे मग ती विकत दिली तरी चालेल. पण जिल्ह्यात लसीचा तुटवडा आहे. ग्रामीण भागात लसीसाठी ग्रामस्थ शोध मोहीम घेतात. दुपारी बारा वाजता कोविन साईट ओपन करतात. अवघ्या पाच मिनिटात लसीचे बुकिंग होते त्यातुन जर नंबर मिळाला अन दिलेल्या केंद्रावर लस घ्यायला गेले तर तिथे कोरोनाची तपासणी करावी लागत असल्याने अनेकजण लस न घेताच माघारी जात आहेत. तपासणीचा अहवाल मग यायचे अधांतरीच रहात आहे, असा सगळा प्रकार जिल्ह्यात सुरू आहे. एकूणच काय तर आई भीक मागू देईना अन् बाप जेऊ देईना, अशी जिल्ह्यातील जनतेची अवस्था झाली आहे.
जिल्ह्यात सातारा अग्रभागी
सातारा तालुका हा सगळ्यात अग्रभागी बाधित अन मृत्यूच्या संख्येमध्ये आहे. बाधित आढळून येणाऱ्यांच्या जिल्ह्यात संख्या ही आतापर्यंत 2 लाख 30 हजाराच्या पुढे गेलेली आहे. जिल्ह्यातील आतापर्यत 15 लाख 30एवढे नमुने तपासणी करण्यात आले आहेत. यामध्ये काहींनी दोन दोन तीन तीन वेळा तपासण्या केल्या आहेत. जिल्ह्यातील लोकसंख्येच्या निम्म्या प्रमाणात तपासण्या झालेल्या आहेत. जिल्ह्यात बाधित येणाऱ्या तालुक्यात सातारा तालुका हा नंबर एकला आहे तर कराड तालुका नंबर दोनला आहे. दरम्यान मृत्यू दर ही कमी होत असून जिल्ह्यातील जनतेच्या दृष्टीने दिलासा आहे.
शनिवारी
तपासणी……………..13,373
बाधित…………………787
पॉझिटिव्हीटी रेट………5.8