ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
सध्या संसदेचे अधिवेशन सुरू असल्याने कंपन्यांनी तूर्तास तरी पेट्रोल आणि डिझेल दर स्थिर ठेवण्याला प्राधान्य दिल्याने सामान्य जनतेला दिलासा मिळाला आहे. आज सलग 21 व्या दिवशी पेट्रोल आणि डिझेलचा भाव ‘जैसे थे’च आहेत.
मुंबईत आज शनिवारी एक लीटर पेट्रोलचा भाव 107.83 रुपये आहे. आज दिल्लीत पेट्रोल 101.84 रुपये आहे. चेन्नईत 102.49 रुपये, तर कोलकातामध्ये एक लीटर पेट्रोलसाठी 102.08 रुपये मोजावे लागत आहेत. तर भोपाळमध्ये साध्या पेट्रोलचा भाव 110.20 रुपयांवर कायम आहे. तर बेंगळूरमध्ये पेट्रोल 105.25 रुपये झाले आहे.
दरम्यान, जागतिक कमॉडिटी बाजारात शुक्रवारी ब्रेंट क्रूडचा भाव 0.19 टक्क्यांनी कमी होऊन 70.64 डॉलर झाला. तर डब्ल्यूटीआय क्रूडचा भाव 1.33 टक्के घसरला आणि तो 68.17 डॉलर प्रती बॅरल झाला. अमेरिकेत कोविड 19 च्या डेल्टा व्हेरिएंटने धुमाकूळ घातला आहे. डेल्टाचे रुग्ण वाढू लागल्याने पुन्हा एकदा लॉकडाऊनची शक्यता गडद बनली आहे.