मुंबई \ ऑनलाईन टीम
बॉलिवूडचे दिग्गज अभिनेते दिलीप कुमार यांची प्रकृती अचानक बिघडल्याने त्यांना मुंबईच्या हिंदुजा रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मागच्या काही दिवसांपासून त्यांना श्वास घेण्यास त्रास जाणवत होता. याची माहिती मिळताच राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा खासदार शरद पवार यांनी हिंदुजा रुग्णालयात जाऊन दिलीप कुमार यांची भेट घेतली. तसेच त्यांच्या प्रकृतीबाबत चर्चाही केली आहे. शरद पवार यांनी ट्विट करुन यासंदर्भात माहिती दिली.
शरद पवार यांना दिलीप कुमार यांच्या प्रकृतीबाबतची माहिती मिळताच, त्यांनी खार येथील हिंदुजा रुग्णालयात जाऊन त्यांच्या तब्येतीची विचारपूस केली. तसेच, अभिनेत्री सायरा बानू यांच्याशी यासंगर्भात चर्चा केली. दिलीप कुमार हे लवकर बरे होवोत, अशी प्रार्थना करत असल्याचंही शरद पवार यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.
दिलीप कुमार यांच्यावर गेल्य काही दिवसांपासून घरीच उपचार सुरु होते. मात्र, आज रविवारी सकाळी त्यांची प्रकृती अचानक बिघडल्याने त्यांना हिंदुजा रूग्णालयात दाखल करण्यात आले.त्यांची प्रकृती स्थिर आहे. दिलीप कुमार यांच्या पत्नी सायरा बानो यांच्या हवाल्याने एएनआयने याबाबतचे वृत्त दिले आहे.