मुंबई \ ऑनलाईन टीम
ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार यांचं निधन झालं आहे. वयाच्या ९८ व्या वर्षी त्यांची प्राणज्योत मालवली. त्याबद्दल सर्वच क्षेत्रातून हळहळ व्यक्त केली जात आहे. विविध क्षेत्रातील व्यक्ती, अनेक राजकीय नेते, अभिनेते यांनीही दिलीप कुमार यांना श्रद्धांजली वाहिली आहे. गानसम्राज्ञी लता मंगेशकर दिलीप कुमार यांना राखी बांधत होत्या. आज भावाच्या निधनाचे वृत्त समजताच लता मंगेशकर यांनी काही जुने फोटो शेअर करत भावनिक पोस्ट शेअर केली आहे.
लता मंगेशकर यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे की, युसूफ भाई, आज आपल्या छोट्या बहिणीला सोडून गेले. युसूफ भाई, का गेलात, एका युगाचा अंत झाला. मला काहीच सूचत नाही. मी खूप दुःखी आहे. निःशब्द आहे. बऱ्याच गोष्टी आठवणी देऊन जातात.
युसूफ भाई, मागील कित्येक वर्षांपासून आजारी होते. कोणाला ओळखत नव्हते अशा काळात सायरा वहिनीने सर्व सोडून दिवस रात्र त्यांची सेवा केली. त्यांच्यासाठी दुसरे जीवन नव्हते. अशा स्त्रीला मी अभिवादन करते आणि युसूफ भाईंच्या आत्म्याला शांती मिळावी म्हणून प्रार्थना करते, असे ट्वीट लता मंगेशकर यांनी केले आहे.