ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांचे कोरोना रिपोर्ट मंगळवारी निगेटिव्ह आले असून त्यांना आज मॅक्स रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. तसेच डॉक्टरांनी त्यांना एक आठवडा आराम करण्याचा सल्ला देखील दिला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मॅक्स रुग्णालयात दाखल असलेेल्या मनीष सिसोदिया यांना शुक्रवारी प्लाझ्मा थेरपी देण्यात आली. त्यानंतर त्यांच्या प्रकृतीत वेगाने सुधारणा होत आहे. यापूर्वी ते एलएनजेपी रुग्णालयात होते. 14 सप्टेंबरला त्यांना कोरोनाची बाधा झाली. त्यानंतर त्यांनी स्वत: ला घरीच क्वॉरंटाइन केलं होते. मात्र, त्यानंतर मनीष सिसोदिया यांना ताप आणि श्वास घेण्यास त्रास होऊ लागल्यावर लोकनायक जयप्रकाश (LNJP) रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. येथे त्यांची तपासणी केली असता त्यांना डेंग्यू झाला असल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे त्याचे प्लेटलेेट्स आणि ऑक्सिजन कमी झाला, त्याच वेळी, त्यांना एलएनजेपीमधून साकेत येथील मॅक्स हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते.
दरम्यान, आज मनीष सिसोदिया यांनी आज कोरोनावर यशस्वीरित्या मात केली असून त्यांना आज घरी सोडण्यात आले आहे.