ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
देशात कोरोना रुग्णांच्या संख्येत लक्षणीय वाढ होत आहे. त्यातच देशाची राजधानी नवी दिल्लीतून एक दिलासादायक बाब समोर आली आहे. दिल्लीत मागील 65 दिवसांमधील कोरोना रुग्णांच्या संख्येत मोठी घट झालेली दिसून आली.
सोमवारी दिल्लीत केवळ 65 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली. तर 26 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे दिल्लीतील कोरोना बाधितांची एकूण संख्या 1 लाख 31 हजार 219 वर पोहचली आहे. यामधील 10 हजार 994 रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
सोमवारी 1497 रुग्णांची प्रकृती सुधारली असून त्यांना घरी सोडण्यात आले आहेे. तर आतापर्यंत 1 लाख 16 हजार 372 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तर आतापर्यंत 3853 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
ताज्या आकडेवारी नुसार, दिल्लीत आतापर्यंत जवळपास 9 लाख 58 हजार 283 टेस्ट करण्यात आल्या आहेत. त्यातील 3821 आरटीपीसीआर टेस्ट आणि 7685 रैपिड एंटिजेन टेस्ट करण्यात आल्या आहेत.