ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
दिल्लीच्या रोहिणी कोर्टात रुम नं 207 मध्ये आज दुपारी गोळीबार झाला. यात गँगस्टर जितेंद्र ऊरफ गोगी यांच्यासह चौघांचा मृत्यू झाला आहे.
मोस्ट वॉन्टेड गँगस्टर जितेंद्र गोगी तिहार जेलमध्ये होता. आज त्याला सुनावणीसाठी कोर्टात आणण्यात आले होते. याचवेळी काही हल्लेखोर वकील बनून कोर्टात आले आणि त्यांनी गोगी याची हत्या केली. त्यानंतर कोर्टात झालेल्या गोळीबारात अन्य तिघांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये दोन हल्लेखोरांचाही समावेश आहे. स्पेशल सेलची टीम गोगीला कोर्ट रुममध्ये घेऊन गेली होती. त्यावेळी ही घटना घडली. दिल्लीच्या टिल्लू गँगने गोगीची हत्या केल्याचे सांगण्यात येते.
दरम्यान, गोगी याच्यावर खून, खंडणी, पोलिसांवर हल्ले यासारखे गंभीर गुन्हे दाखल होते. मागील वर्षी त्याला गुरूग्राममधून अटक करण्यात आली होती. तेव्हा त्याच्यावर पोलिसांनी 8 लाख रुपये बक्षीस ठेवले होते.