ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
राजधानी दिल्लीतील कोरोना रूग्णांच्या संख्येत झपाटय़ाने घट होताना दिसत आहे. मागील 24 तासात केवळ 20 नवे रुग्ण आढळून आले. तर एका रुग्णांचा मृत्यू झाला. आरोग्य विभागाकडून मंगळवारी मिळालेल्या ताज्या माहितीनुसार, कालच्या दिवशी 36 रुग्ण बरे झाले आहेत. सद्य स्थितीत 375 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. यातील 266 रुग्ण हे रुग्णालयात दाखल आहेत. होम आयसोलेशनमध्ये 88 रुग्णांवर उपचार सुरु आहे. कोविड केअर सेंटरमध्ये केवळ एका रूग्णावर उपचार सुरू आहे.
राजधानीत कोरोना रुग्णांची एकूण संख्या 14 लाख 37 हजार 736 वर पोहोचली आहे. त्यातील 14 लाख 12 हजार 280 रुग्ण आतापर्यंत कोरोनामुक्त झाले आहेत. सद्य स्थितीत संसर्ग दर 0.4 टक्के इतका आहे. तर आतापर्यंत 25,081 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
दिल्लीत आतापर्यंत जवळपास 2 कोटी 56 लाख 23 हजार 431 टेस्ट करण्यात आल्या आहेत. यातील 41,577 आरटीपीसीआर टेस्ट आणि ।810 रैपिड एंटिजेन टेस्ट काल एका दिवसात करण्यात आल्या आहेत. सद्य स्थितीत दिल्लीत 144 झोन आहेत.
मागील 24 तासात 10,826 जणांचे लसीकरण
ताज्या आकडेवारी नुसार, दिल्लीत मागील 24 तासात 10 हजार 826 लोकांना लस देण्यात आली. यामध्ये 3412 जणांना पहिला डोस तर 7414 जणांना दुसरा डोस देण्यात आला. तर राजधानी दिल्लीत आतापर्यंत एकूण 1 कोटी 32 लाख 13 हजार 444 जणांचे लसीकरण पूर्ण झाले आहे. यातील 94,37,206 जणांनी पहिला डोस घेतला आहे. तर 37,76,238 नागरिकांना दुसरा डोस घेतला आहे.