ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
राजधानी दिल्लीत मागील काही दिवसांपासून कोरोना रुग्णसंख्येत मोठ्या प्रमाणात घट होताना दिसत आहे. मागील 24 तासात केवळ 228 नवे रुग्ण आढळून आले. तर, दिल्लीतील संसर्गाचा दरात घट झाला असून 0.32 % इतका झाला आहे. कालच्या दिवसात 12 रुग्णांचा मृत्यू झाला. तर 364 रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला.
आरोग्य विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, सद्य स्थितीत राज्यात 3,078 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. त्यामुळे दिल्लीतील कोरोना रुग्णांची एकूण संख्या 14 लाख 31 हजार 498 वर पोहोचली आहे. त्यातील 14 लाख 03 हजार 569 रुग्ण आतापर्यंत कोरोनामुक्त झाले आहेत. तर 24,851 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
- मागील 24 तासात 60,949 जणांचे लसीकरण
ताज्या आकडेवारी नुसार, दिल्लीत मागील 24 तासात 60,949 लोकांना लस देण्यात आली. यामध्ये 40,031 जणांना पहिला डोस तर 20,918 जणांना दुसरा डोस देण्यात आला. तर राजधानी दिल्लीत आतापर्यंत एकूण 61 लाख 47 हजार 977 जणांचे लसीकरण पूर्ण झाले आहे. यातील 46,84,158 जणांनी पहिला डोस घेतला आहे. तर 14,63,819 नागरिकांना दुसरा डोस घेतला आहे.