ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
राजधानी दिल्लीतील कोरोना रूग्णांच्या संख्येत झपाटय़ाने घट होताना दिसत आहे. मागील 24 तासात 39 नवे रुग्ण आढळून आले. तर एकाही रुग्णांचा मृत्यू झालेला नाही. आरोग्य विभागाकडून मंगळवारी मिळालेल्या ताज्या माहितीनुसार, कालच्या दिवशी 114 रुग्ण बरे झाले आहेत. सद्य स्थितीत 411 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. यातील 264 रुग्ण हे रुग्णालयात दाखल आहेत. होम आयसोलेशनमध्ये 106 रुग्णांवर उपचार सुरु आहे. कोविड केअर सेंटरमध्ये केवळ 02 आणि कोविड आरोग्य केंद्रात एकही रुग्ण नाही आहे.
राजधानीत कोरोना रुग्णांची एकूण संख्या 14 लाख 37 हजार 485 वर पोहोचली आहे. त्यातील 14 लाख 11 हजार 995 रुग्ण आतापर्यंत कोरोनामुक्त झाले आहेत. सद्य स्थितीत संसर्ग दर 0.6 टक्के इतका आहे. तर आतापर्यंत 25,079 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
दिल्लीत आतापर्यंत जवळपास 2 कोटी 52 लाख 07 हजार663 टेस्ट करण्यात आल्या आहेत. यातील 42,085 आरटीपीसीआर टेस्ट आणि 22,725 रैपिड एंटिजेन टेस्ट काल एका दिवसात करण्यात आल्या आहेत. सद्य स्थितीत दिल्लीत 220 झोन आहेत.
- मागील 24 तासात 1,43,264 जणांचे लसीकरण
ताज्या आकडेवारी नुसार, दिल्लीत मागील 24 तासात 1,43,264 लोकांना लस देण्यात आली. यामध्ये 1,00,159 जणांना पहिला डोस तर 43,105 जणांना दुसरा डोस देण्यात आला. तर राजधानी दिल्लीत आतापर्यंत एकूण 1 कोटी 24 लाख 60 हजार 536 जणांचे लसीकरण पूर्ण झाले आहे. यातील 89,28,143 जणांनी पहिला डोस घेतला आहे. तर 35,32, 393 नागरिकांना दुसरा डोस घेतला आहे.
- दिल्ली : कोरोनाची 24 ऑगस्टची आकडेवारी
नवीन रुग्ण : 39
मृत्यू : 00
बरे झालेल्यांची संख्या : 114
एकूण सक्रिय रुग्ण : 411