- कोरोना बाधितांनी ओलांडला 6. 60 लाखांचा टप्पा
ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
राजधानी दिल्लीत दैनंदिन रुग्ण संख्या वाढीत किंचित घट झालेली पाहायला मिळत आहे. मागील 24 तासात दिल्लीत 922 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली. तर 4 जणांचा मृत्यू झाला आहे.
आरोग्य विभागाकडून मिळालेल्या ताज्या आकडेवारी नुसार, काल 1,591 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. त्यामुळे दिल्लीतील कोरोना बाधितांची एकूण संख्या 6 लाख 60 हजार 616 वर पोहचली आहे. तर आतापर्यंत 6 लाख 42 हजार 166 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.
तर आतापर्यंत 11,016 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. मृत्यू दराचे प्रमाण 1.67 % इतके आहे. सद्य स्थितीत 7,429 रुग्णांवर विविध रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
दिल्लीत आतापर्यंत जवळपास 1 कोटी 45 लाख 08 हजार 592 टेस्ट करण्यात आल्या आहेत. त्यातील 28,616 आरटीपीसीआर टेस्ट आणि 8139 रैपिड एंटिजेन टेस्ट करण्यात आल्या आहेत. सद्य स्थितीत कोरोना संसर्गाचे प्रमाण 4.55 % आहे. तर 1903 झोन आणि 234 कंट्रोल रूम आहे.