ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
राजधानी दिल्लीत कोरोना रूग्णांच्या संख्येत मोठय़ा प्रमाणात घट होताना दिसत आहे. मागील 24 तासात केवळ 57 नवे रुग्ण आढळून आले. दिलासादायक बाब म्हणजे दिवसभरात एकाही रुग्णांचा मृत्यू झालेला नाही आहे. तर कालच्या दिवशी 46 रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला.
आरोग्य विभागाकडून शुक्रवारी मिळालेल्या ताज्या माहितीनुसार, राजधानीत कोरोना रुग्णांची एकूण संख्या 14 लाख 37 हजार 274 वर पोहोचली आहे. त्यातील 14 7लाख 11 हजार 736 रुग्ण आतापर्यंत कोरोनामुक्त झाले आहेत. सद्य स्थितीत संसर्ग दर 0.8 टक्के इतका आहे. तर आतापर्यंत 25,079 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
सद्य स्थितीत 459 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. दिल्लीत आतापर्यंत जवळपास 2 कोटी 49 लाख 83 हजार 238 टेस्ट करण्यात आल्या आहेत. यातील 51,028 आरटीपीसीआर टेस्ट आणि 22,690 रैपिड एंटिजेन टेस्ट काल एका दिवसात करण्यात आल्या आहेत. सद्य स्थितीत दिल्लीत 237 झोन आहेत.