ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
राजधानी दिल्लीत मागील 24 तासात 115 नवे रुग्ण आढळून आले आणि चार रुग्णांचा मृत्यू झाला आहे. 96 दिवसांनंतर दैनंदिन मृतांची संख्या सर्वात कमी आली आहे. यापूर्वी 21 मार्च रोजी एका व्यक्तीचा मृत्यू झाला होता. या नंतर हा आकडा 4 आणि त्यापेक्षा जास्तच राहिला आहे.
आरोग्य विभागाकडून मिळालेल्या ताज्या माहितीनुसार, कालच्या दिवशी 198 रुग्ण बरे झाले आहेत. सद्य स्थितीत 1 हजार 680 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. यातील 1044 रुग्ण हे रुग्णालयात दाखल आहेत. होम आयसोलेशनमध्ये 503 रुग्णांवर उपचार सुरु आहे. कोविड केअर सेंटरमध्ये 12 आणि कोविड आरोग्य केंद्रात 6 रुग्ण आहेत.
राजधानीत कोरोना रुग्णांची एकूण संख्या 14 लाख 33 हजार 590 वर पोहोचली आहे. त्यातील 14 लाख 06 हजार 958 रुग्ण आतापर्यंत कोरोनामुक्त झाले आहेत. सद्य स्थितीत संसर्ग दर 0.15 % इतका आहे. तर आतापर्यंत 24,952 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
दिल्लीत आतापर्यंत जवळपास 2 कोटी 11 लाख 30 हजार 759 टेस्ट करण्यात आल्या आहेत. यातील 54,739 आरटीपीसीआर टेस्ट आणि 22,738 रैपिड एंटिजेन टेस्ट काल एका दिवसात करण्यात आल्या आहेत. सद्य स्थितीत दिल्लीत 2,048 झोन आहेत.
दिल्ली : कोरोनाची 25 जूनची आकडेवारी :
- नवीन रुग्ण : 115
- मृत्यू : 04
- सक्रिय रुग्ण : 1680
- बरे झालेल्यांची संख्या : 191