ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
दिल्लीतील तिन्ही महापालिकांचे विलीनीकरण होणार आहे. संदर्भातील विधेयकाला मोदी मंत्रिमंडळाने नुकतीच मंजुरी दिली आहे. संसदेच्या चालू अर्थसंकल्पीय अधिवेशनातच हे विधेयक मांडले जाण्याची शक्यता आहे. संसदेत हे विधेयक मंजूर झाल्यानंतर दिल्लीत तीनऐवजी एकच महापालिका असेल.
दिल्लीत दक्षिण, उत्तर आणि पूर्व दिल्ली महानगरपालिका आहे. या तिन्ही महापालिकांमध्ये एकूण 272 प्रभाग आहेत. या महापालिकांच्या निवडणुका 18 मार्चपूर्वी होणार आहेत. त्यापूर्वीच केंद्रीय मंत्रिमंडळाने दिल्ली महानगरपालिका (दुरुस्ती) विधेयकाला मंजुरी दिली आहे, ज्यामध्ये तीन महापालिकांचे विलीनीकरण करण्याचा प्रस्ताव आहे. तीन महापालिकांच्या विलीनीकरणानंतर दिल्लीतील आप सरकार अस्तित्वात येणाऱ्या महापालिकांपासून पूर्णपणे दूर राहण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. केंद्र सरकार दिल्ली सरकारकडून म्युनिसिपल कॉर्पोरेशन ॲक्टच्या (डीएमसी ॲक्ट) 17 कलमांचे अधिकार काढून घेऊ शकते. त्यामुळे आपसाठी हा झटका मानला जात आहे.