ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
मागील काही दिवसांपासून दिल्लीत लसीकरणाचा तुटवडा मोठ्या प्रमाणात वाढत आहे. राज्याचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी आज पुन्हा एकदा केंद्रावर निशाणा साधला तसेच यावेळी एक मोठी बातमी देखील दिली आहे. ते म्हणाले, ‘स्पुटनिक व्ही’ च्या निर्मात्यांनी दिल्लीला लस देण्यासाठी तयार असल्याचे सांगितले.
पुढे ते म्हणाले, ‘स्पुटनिक व्ही’ च्या निर्मात्यांशी आमची चर्चा सुरु आहे. ते आम्हाला कोरोनाच्या लस देण्यासाठी तयार आहेत. मात्र, किती लस दिल्या जाणार याबाबत काही निर्णय झालेला नाही आहे. पण यामुळे आता दिल्लीतील लसीकरणाचे संकट काही प्रमाणात कमी होणार आहे.
पुढे ते म्हणाले, दिल्लीतील ब्लॅक फंगस रुग्णांची संख्या 620 वर पोहचली आहे. यावर उपचार करण्यासाठी लागणाऱ्या ‘एम्फोटेरिसीन – बी’ या इंजेक्शनची देखील कमतरता भासत आहे.