ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
दिल्लीत काल रात्री सिलिंडरचा स्फोट झाल्याची घटना घडली आहे. ही घटना शाहदरामधील फर्श बाजारात घडली. या स्फोटामुळे लागलेल्या आगीत होरपळून चार जणांचा मृत्यू झाला आहे तर एक जण जखमी झाला आहे.
अग्निशमन दलाचे निर्देशक अतुल गर्ग यांनी या घटनेबाबत माहिती देताना सांगितले की, सिलिंडरचा स्फोट झाल्याने ही आग लागली. या आगीत चार जणांचा मृत्यू झाला असून एक जण जखमी झाला आहे. जखमीला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
दरम्यान, पोलिसांनी चारही मृतदेह ताब्यात घेतले असून पोस्टमार्टमसाठी पाठवण्यात आले आहेत. या घटनेचा अधिक तपास पोलीस करीत आहेत.