ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
दिल्लीतील सर गंगाराम रुग्णालयात जवळपास 3 महिन्यानंतर 1 जुलैपासून ओपीडी सेवा सुरू करण्यात येणार आहे अशी माहिती रुग्णालयाचे चेअरमन डॉ. डी एस राणा यांनी शनिवारी दिली. सकाळी आठ ते रात्री आठ वाजेपर्यंत ओपीडी सेवा सुरू असणार असे त्यांनी यावेळी सांगितले.
पुढे ते म्हणाले, आमची ओपीडी सेवा नेहमीसारखी असणार आहे. तरी देखील आम्ही रुग्णांच्या आरोग्याच्या सुरक्षेची संपूर्ण काळजी घेणार आहोत. आमच्या येथील सर्व ओपीडी वार्ड हे ग्रीन कोवीड सेफ झोनमध्ये आहेत. तसेच रुग्णालयाकडून रुग्ण आणि नर्स यांच्या सुरक्षेसाठी मार्गदर्शक नियमांचे कठोर पालन करणार आहोत.
पुढे ते म्हणाले, आमचे रुग्णालय कोरोना संकट काळात रुग्णांच्या आरोग्याच्या सुरक्षेसाठी तसेच संसर्ग वाढू नये सर्वोत्कृष्ट उपाय योजना आणि सुरक्षित वातावरणात तयार करू, असे त्यांनी यावेळी सांगितले.