ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
दिल्लीत आज दिवसभरात 674 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली. तर 12 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे दिल्लीतील कोरोना बाधितांची एकूण संख्या 1 लाख 39 हजार 156 वर पोहचली आहे. यामधील 9897 रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
मंगळवारी 972 रुग्णांची प्रकृती सुधारली असून त्यांना घरी सोडण्यात आले आहेे. तर आतापर्यंत 1 लाख 25 हजार 226 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तर आतापर्यंत 4033 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे दिल्ली वासियांची चिंता वाढली असून भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
ताज्या आकडेवारी नुसार, दिल्लीत आतापर्यंत जवळपास 10 लाख 83 हजार 097 टेस्ट करण्यात आल्या आहेत. त्यातील 4108 आरटीपीसीआर टेस्ट आणि 5187 रैपिड एंटिजेन टेस्ट करण्यात आल्या आहेत.