ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
दिल्लीत आज दिवसभरात 1195 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली. तर 26 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे दिल्लीतील कोरोना बाधितांची एकूण संख्या 1 लाख 35 हजार 598 वर पोहचली आहे. यामधील 10 हजार 705 रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
शुक्रवारी 1206 रुग्णांची प्रकृती सुधारली असून त्यांना घरी सोडण्यात आले आहेे. तर आतापर्यंत 1 लाख 20 हजार 930 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तर आतापर्यंत 3963 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे दिल्ली वासियांची चिंता वाढली असून भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
ताज्या आकडेवारी नुसार, दिल्लीत आतापर्यंत जवळपास 10 लाख 35 हजार 785 टेस्ट करण्यात आल्या आहेत. त्यातील 5629 आरटीपीसीआर टेस्ट आणि 13,462 रैपिड एंटिजेन टेस्ट करण्यात आल्या आहेत.