ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
देशाची राजधानी असलेल्या दिल्लीत कोरोना रुग्णांची संख्या वाढतच चालली आहे. गेल्या चोवीस तासांत 310 कोरोना रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे दिल्लीत कोरोना रुग्णांची एकूण संख्या 7 हजार 233 वर पोहोचली आहे, अशी माहिती दिल्लीचे आरोग्य मंत्री सत्येंद्र जैन यांनी दिली.
ते म्हणाले, दिवसेंदिवस दिल्लीमध्ये कोरोना रुग्णांची संख्या आणि कोरोनामुळे मृत पावलेल्या व्यक्तींच्या संख्येत वाढ होत आहे. मागील चोवीस तासात 310 रुग्ण पॉझिटिव्ह सापडले. याआधी 16 एप्रिलला 356 रुग्णांना कोरोनाचा संसर्ग झाला होता. तर आत्तापर्यंत एकूण 70 पेक्षा अधिक जणांनी आपला जीव गमावला आहे. 2,067 जणांची प्रकृती स्थिर असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे.
पुढे ते म्हणाले, दिल्लीची एकूण परिस्थिती पाहता आता दिल्लीतील सर्व रुग्णालयांना रोजच्या रोज मृत व्यक्तींच्या रिपोर्टसोबत एकूण आकडा देखील सांगण्यास सांगितले आहे.
दरम्यान, दिल्लीतील सर्व जिल्हे हे रेड झोन मध्ये असून ज्या जिल्ह्यात 10 पेक्षा अधिक रुग्ण असलेले जिल्हे रेड झोनमध्ये आहेत.