ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
दिल्लीत मागील 24 तासात 4,473 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली. तर 33 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे दिल्लीतील कोरोना बाधितांची एकूण संख्या 2 लाख 30 हजार 269 वर पोहचली आहे. यामधील 30,914 रुग्णांवर विविध रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
दिलासादायक बाब म्हणजे एका दिवसात 3,313 रुग्णांची प्रकृती सुधारली असून त्यांना घरी सोडण्यात आले आहेे. तर आतापर्यंत 1 लाख 94 हजार 516 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तर आतापर्यंत 4,839 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे दिल्ली वासियांची चिंता वाढली असून भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
ताज्या आकडेवारी नुसार, दिल्लीत आतापर्यंत जवळपास 23 लाख 09 हजार 578 टेस्ट करण्यात आल्या आहेत. त्यातील 11,275 आरटीपीसीआर टेस्ट आणि 51,318 रैपिड एंटिजेन टेस्ट करण्यात आल्या आहेत.
सद्य स्थितीत कोरोना संसर्गाचे प्रमाण 7.15 % आहे. तर 1637 झोन आणि 186 कंट्रोल रूम आहेत.