ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
दिल्लीत कोरोनाचा संसर्ग दिवसेंदिवस वेगाने वाढत आहे. दिल्लीत गेल्या 24 तासात 1093 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली. तर 29 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे दिल्लीतील कोरोना बाधितांची एकूण संख्या 1 लाख 34 हजार 403 वर पोहचली आहे. सद्य स्थितीत 10 हजार 743 रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
दिलासादायक बाब म्हणजे गुरुवारी 1091 रुग्णांची प्रकृती सुधारली असून त्यांना घरी सोडण्यात आले आहेे. तर आतापर्यंत 1 लाख 19 हजार 724 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तर आतापर्यंत 3936 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे दिल्ली वासियांची चिंता वाढली असून भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
ताज्या आकडेवारी नुसार, दिल्लीत आतापर्यंत जवळपास 10 लाख 13 हजार 694 टेस्ट करण्यात आल्या आहेत. त्यातील 5531 आरटीपीसीआर टेस्ट आणि 13944 रैपिड एंटिजेन टेस्ट करण्यात आल्या आहेत.