ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
राजधानी दिल्लीत कोरोना रूग्णांच्या संख्येत घट होताना दिसत आहे. मागील 24 तासात 53 नवे रुग्ण आढळून आले असून 03 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर कालच्या दिवशी 99 रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला.
- संसर्ग दर 0.7 %
आरोग्य विभागाकडून मिळालेल्या ताज्या माहितीनुसार, राजधानीत कोरोना रुग्णांची एकूण संख्या 14 लाख 35 हजार 083 वर पोहोचली आहे. त्यातील 14 लाख 09 हजार 325 रुग्ण आतापर्यंत कोरोनामुक्त झाले आहेत. सद्य स्थितीत संसर्ग दर 0.7 % इतका आहे. तर आतापर्यंत 25,015 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
- सध्या राजधानीत 576 झोन
सद्य स्थितीत 743 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. दिल्लीत आतापर्यंत जवळपास 2 कोटी 23 लाख 04 हजार 187 टेस्ट करण्यात आल्या आहेत. यातील 53,280 आरटीपीसीआर टेस्ट आणि 23,543 रैपिड एंटिजेन टेस्ट काल एका दिवसात करण्यात आल्या आहेत. सद्य स्थितीत दिल्लीत 576 झोन आहेत.
- लसीकरणाचा डाटा
ताज्या आकडेवारी नुसार, दिल्लीत मागील 24 तासात 79,627 लोकांना लस देण्यात आली. यामध्ये 52,434 जणांना पहिला डोस तर 27, 193 जणांना दुसरा डोस देण्यात आला. तर राजधानी दिल्लीत आतापर्यंत एकूण 88 लाख 96 हजार 884 जणांचे लसीकरण पूर्ण झाले आहे. यातील 68,19, 406 जणांनी पहिला डोस घेतला आहे. तर 20,77, 478 नागरिकांना दुसरा डोस घेतला आहे.