ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
दिल्लीत मागील 24 तासात दिल्लीत 7 हजार 546 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली. तर 98 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे दिल्लीतील कोरोना बाधितांची एकूण संख्या 5 लाख 10 हजार 630 वर पोहचली आहे. यामधील 43,221 रुग्णांवर विविध रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
दिलासादायक बाब म्हणजे काल दिवसभरात 6,685 रुग्णांची प्रकृती सुधारली असून त्यांना घरी सोडण्यात आले आहेे. तर आतापर्यंत 4 लाख 59 हजार 368 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तर आतापर्यंत 8,041 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे दिल्ली वासियांची चिंता वाढली असून भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
ताज्या आकडेवारी नुसार, दिल्लीत आतापर्यंत जवळपास 56 लाख 53 हजार 091 टेस्ट करण्यात आल्या आहेत. त्यातील 22,067 आरटीपीसीआर टेस्ट आणि 40,370 रैपिड एंटिजेन टेस्ट करण्यात आल्या आहेत.
सद्य स्थितीत कोरोना संसर्गाचे प्रमाण 12.09 % आहे. तर 4501 झोन आणि 378 कंट्रोल रूम आहेत.