ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
देशात कोरोनाचा प्रसार वेगाने वाढत आहे. देशाची राजधानी दिल्लीत शनिवारी 1142 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली. तर 29 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे दिल्लीतील कोरोना बाधितांची एकूण संख्या 1 लाख 29 हजार 531 वर पोहचली आहे. यामधील 12 हजार 657 रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
शनीवारी 2137 रुग्णांची प्रकृती सुधारली असून त्यांना घरी सोडण्यात आले आहेे. तर आतापर्यंत 1 लाख 13 हजार 068 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तर आतापर्यंत 3806 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे दिल्ली वासियांची चिंता वाढली असून भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
ताज्या आकडेवारी नुसार, दिल्लीत आतापर्यंत जवळपास 9 लाख 29 हजार 244 टेस्ट करण्यात आल्या आहेत. त्यातील 5690 आरटीपीसीआर टेस्ट आणि 14,819 रैपिड एंटिजेन टेस्ट करण्यात आल्या आहेत.