ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
दिल्लीत मागील 24 तासात 261 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली. तर एकाचा मृत्यू झाला. त्यामुळे दिल्लीतील कोरोना बाधितांची एकूण संख्या 6 लाख 40 हजार 182 वर पोहचली आहे. यामधील 1,701 रुग्णांवर विविध रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
दिलासादायक बाब म्हणजे काल दिवसभरात 143 रुग्णांची प्रकृती सुधारली असून त्यांना घरी सोडण्यात आले आहेे. तर आतापर्यंत 6 लाख 27 हजार 566 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तर आतापर्यंत 10,915 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
ताज्या आकडेवारी नुसार, दिल्लीत आतापर्यंत जवळपास 1 कोटी 26 लाख 22 हजार 319 टेस्ट करण्यात आल्या आहेत. त्यातील 43,460 आरटीपीसीआर टेस्ट आणि 22,972 रैपिड एंटिजेन टेस्ट एका दिवसात करण्यात आल्या आहेत.