ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
देशात कोरोनाचा प्रसार वेगाने वाढत आहे. देशाची राजधानी दिल्लीत मागील 24 तासात 1227 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली. तर 29 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे दिल्लीतील कोरोना बाधितांची एकूण संख्या 1 लाख 26 हजार 323 वर पोहचली आहे. यामधील 14 हजार 954 रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
बुधवारी 1532 रुग्णांची प्रकृती सुधारली असून त्यांना घरी सोडण्यात आले आहेे. तर आतापर्यंत 1 लाख 07 हजार 650 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तर आतापर्यंत 3719 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे दिल्ली वासियांची चिंता वाढली असून भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
ताज्या आकडेवारी नुसार, दिल्लीत आतापर्यंत जवळपास 8 लाख 71 हजार 371 टेस्ट करण्यात आल्या आहेत. त्यातील 5250 आरटीपीसीआर टेस्ट आणि 14,810 रैपिड एंटिजेन टेस्ट करण्यात आल्या आहेत. तर दरम्यान, सध्या दिल्लीत 693 कॅन्टोन्मेंट झोन आहेत.