ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
देशाची राजधानी असलेल्या दिल्लीत गेल्या चोवीस तासांत पहिल्यांदाच सर्वाधिक म्हणजेच 384 कोरोना रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे दिल्लीत कोरोना रुग्णांची एकूण संख्या 4 हजार 122 वर पोहोचली आहे. याआधी 16 एप्रिलला 356 रुग्णांना कोरोना चा संसर्ग झाला होता. यामध्ये लोकपाल सदस्य, माजी न्यायाधीश अजय त्रिपाठी यांचा देखील समावेश आहे.
एकीकडे रुग्णांची संख्या वाढत असताना मृत्यूचे प्रमाण गेल्या काही दिवसांपासून कमी झाले आहे. गेल्या चोवीस तासांत तीन जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तर आत्तापर्यंत एकूण 64 जणांनी आपला जीव गमावला आहे. 1256 जणांनी प्रकृती स्थिर असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे.
दरम्यान, दिल्लीतील सर्व जिल्हे हे रेड झोन मध्ये असून ज्या जिल्ह्यात 10 पेक्षा अधिक रुग्ण असलेले जिल्हे रेड झोनमध्ये आहेत.