2,500 कोटींचे हेरॉईन जप्त – आंतरराज्य टोळीतील चौघांना अटक
दिल्लीत सुरक्षा यंत्रणांनी एका मोठय़ा ड्रग्ज रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. एका आंतरराज्य टोळीवर कारवाई करत 2,500 कोटी किंमतीचे 350 किलो हेरॉईन पोलिसांनी जप्त केले आहे. या कारवाईत पोलिसांनी चार आरोपींनाही अटक केली आहे. अटक केलेल्या आरोपींपैकी तीन जणांना हरियाणा आणि एका आरोपीला दिल्लीतूनच अटक करण्यात आली आहे. अटक केलेल्या आरोपींची चौकशी केली जात आहे. दिल्ली पोलिसांची ही आतापर्यंतची सर्वात मोठी कारवाई असल्याची चर्चा आहे.
दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने अमली पदार्थांची तस्करी करणाऱया टोळीचा पर्दाफाश केल्याने ड्रग्ज तस्करांचे धाबे दणाणले आहेत. पोलिसांनी जप्त केलेल्या हेरॉईनची किंमत अडीच हजार कोटी रुपये असल्याचा दावा करण्यात येत आहे. हे प्रकरण नार्को टेररिझमशी संबंधित असू शकते. त्या दृष्टीने तपास सुरू आहे. या सिंडिकेटचा पाकिस्तानशीही संबंध जोडला जाण्याची शक्मयता आहे.
मुंबई-दिल्लीसह अनेक राज्यांशी धागेदोरे
अमली पदार्थांची तस्करी करणाऱयांवर गेल्या अनेक महिन्यांपासून बारीक नजर ठेवण्यात आली होती. त्यानुसार सापळा रचून एकूण 350 किलो हेरॉईन जप्त करण्यात आले असून एका अफगाण नागरिकाला अटक केली आहे. हेरॉईनचा माल कंटेनरमध्ये लपवून समुद्रमार्गे मुंबईहून दिल्लीला आला. मध्यप्रदेशातील शिवपुरी जवळील कारखान्यात ड्रग्ज अधिक दर्जेदार बनविली जात होती. त्यानंतर ड्रग्ज पंजाबला पाठवले जात होते. तसेच फरिदाबादमध्ये अमली पदार्थ लपविण्यासाठी भाडय़ाने घर घेण्यात आले होते, अशी माहिती दिल्ली पोलिसांच्या विशेष कक्षाचे पोलीस आयुक्त निरज ठाकूर यांनी सांगितले.
अफगाणिस्तानमधून ऑपरेटिंग या ड्रग्ज रॅकेटचे ऑपरेटिंग अफगाणिस्तानातून होत असल्याची माहिती प्राथमिक चौकशीतून पुढे आली आहे. तसेच पाकिस्तानचे कनेक्शनही पुढे आले आहे. पाकिस्तानमधून विविध प्रकारच्या अमली पदार्थांची समुद्रमार्गे आणि निकटच्या राज्यांमधील सीमावर्ती भागातून छुप्या पद्धतीने वाहतूक केली जात असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. याबाबत अधिक शहानिशा केली जात आहे