- 47 दिवसांनंतर एका दिवसात 100 पेक्षा कमी मृत्यू
ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
राजधानी दिल्लीत कोरोना रुग्णांच्या संख्येत लक्षणीय घट होताना दिसत आहे. मागील 24 तासात एक हजार पेक्षा कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. तर 78 जणांनी आपला जीव गमावला आहे. 47 दिवसांनंतर राजधानीत एका दिवसात 100 पेक्षा कमी मृत्यूंची नोंद झाली आहे.
आरोग्य विभागाकडून दिलेल्या माहितीनुसार, मागील 24 तासात राज्यात 946 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली. तर 1,803 रुग्णांची प्रकृती सुधारली असून त्यांना घरी सोडण्यात आले आहेे. त्यामुळे दिल्लीतील कोरोना बाधितांची एकूण संख्या 14 लाख 25 हजार 592 वर पोहचली आहे. तर आतापर्यंत 13 लाख 89 हजार 341 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.
सद्य स्थितीत 12 हजार 100 वर रुग्णांवर विविध रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तर आतापर्यंत 24,151 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तर कोरोना संसर्गाचा दर कमी होऊन 1.25 टक्क्यांवर पोहोचला आहे. 21 मार्च नंतर नोंद झालेला हा सर्वात कमी दर आहे. 21 मार्च रोजी 1.3 टक्के होता.
ताज्या आकडेवारी नुसार, दिल्लीत आतापर्यंत जवळपास 1 कोटी 92 लाख 37 हजार 040 टेस्ट करण्यात आल्या आहेत. त्यातील 53,259 आरटीपीसीआर टेस्ट आणि 22,181 रैपिड एंटिजेन टेस्ट एका दिवसात करण्यात आल्या आहेत.
दिल्लीत मागील 24 तासात 53,918 लोकांना लस देण्यात आली. यामध्ये 38,784 जणांना पहिला डोस 15,134 जणांना दुसरा डोस देण्यात आला. तर राजधानी दिल्लीत आतापर्यंत एकूण 53 लाख 43 हजार 766 जणांचे लसीकरण पूर्ण झाले आहे.