- कोरोनामुक्त रुग्णांची संख्या 13 लाखांच्या उंबरठ्यावर!
ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
राजधानी दिल्लीत मागील 24 तासात कोरोना रुग्णांच्या संख्येत उल्लेखनीय कमी दिसून आली आहे. राज्यात काल 6,430 नवे कोरोना रुग्ण आढळून आले. तर 337 रुग्णांचा मृत्यू झाला. त्यामुळे दिल्लीतील कोरोना संक्रमणाचा दर 11.32 % इतका झाला आहे. काही दिवसांपूर्वी हा दर 35 टक्क्यांपर्यंत पोहचला होता. त्यात मोठ्या प्रमाणात कमी दिसून आली आहे. त्यामुळे रुग्णांची संख्या 13 लाख 87 हजार 411 वर पोहोचली आहे.
त्यातच मागील 24 तासात 11,592 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. तर आतापर्यंत 12 लाख 99 हजार 872 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तर 21,244 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. सद्य स्थितीत 66 हजार 295 रुग्णांवर विविध रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
दिल्लीत आतापर्यंत जवळपास 1 कोटी 82 लाख 26 हजार 667 टेस्ट करण्यात आल्या आहेत. त्यातील 46,774 आरटीपीसीआर टेस्ट आणि 10,037 रैपिड एंटिजेन टेस्ट काल एका दिवसात करण्यात आल्या आहेत. सद्य स्थितीत दिल्लीत 57,179 झोन आणि 609 कंट्रोल रूम आहे.